शिवप्रहार न्युज - श्रीरामपूरच्या माजी आमदारांवरील गोळीबाराचा मुद्दा आजी आमदारांनी विधानसभेत मांडला…
श्रीरामपूरच्या माजी आमदारांवरील गोळीबाराचा मुद्दा आजी आमदारांनी विधानसभेत मांडला…
श्रीरामपूर - श्रीरामपूर विधानसभेचे माजी आमदार भाऊसाहेब मल्हारी कांबळे यांच्यावर दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 01 वाजताच्या सुमारास अशोकनगर-मातापुर परिसरात तीन अनोळखी आरोपींनी गोळीबार केला होता.या गुन्ह्यातील आरोपींना अजून अटक झालेली नाही. म्हणून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार म्हणजेच आजी आमदार हेमंत ओगले यांनी आज विधान भवनामध्ये हा मुद्दा उपस्थित केला.
यावेळी त्यांनी म्हटले की,दोन वेळेस सभागृहाच्या सदस्य राहिलेल्या माजी आमदारांना न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्यांना कधी न्याय मिळणार ? तसेच तीन आरोपींपैकी एकालाही अटक झालेली नाही.तरी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून आरोपींना अटक करावी. त्यामुळे आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार हेमंत ओगले यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्या संदर्भात काय आदेश पारित करतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.