शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरातील सहाय्यक निबंधक कार्यालयातील व्हिडिओ व्हायरल...
श्रीरामपुरातील सहाय्यक निबंधक कार्यालयातील व्हिडिओ व्हायरल...
श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरामध्ये असलेल्या सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये सहाय्यक निबंधक संजय रुद्राक्ष व महिला श्रीमती गोरेताई यांच्यातील संवादाचा व्हिडिओ नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून व्हायरल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,महिला श्रीमती गोरेताई यांनी माहिती अधिकारांतर्गत अंबिका महिला पतसंस्थेच्या संदर्भातील माहिती श्रीरामपुरातील सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे मागितली आहे.तरी अद्यापपर्यंत त्यांना सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून सदर माहिती न मिळाल्यामुळे त्यांनी वैतागून शेवटी सहाय्यक निबंधक कार्यालयात जात सहाय्यक निबंधक संजय रुद्राक्ष यांना जाब विचारत माहिती तात्काळ देण्याची मागणी केली.तेव्हा त्यांच्यात झालेल्या जोरदार खडाजंगीचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड करण्यात आला होता.तो नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून व्हायरल केला आहे.
दरम्यान आज भावे यांनी सहाय्यक निबंधकाला जाब विचारण्यासाठी श्रीरामपूरला येणार असल्याचे देखील दुसऱ्या एका व्हिडिओ मध्ये सांगितले आहे.