शिवप्रहार न्युज - साजरा करताय ३१ डिसेंबर पोलिसांची आहे करडी नजर....

शिवप्रहार न्युज -  साजरा करताय ३१ डिसेंबर पोलिसांची आहे करडी नजर....

साजरा करताय ३१ डिसेंबर पोलिसांची आहे करडी नजर....

श्रीरामपूर- आज इंग्रजी वर्षाचा शेवटचा दिवस अर्थातच ३१ डिसेंबर आहे आणि या दिवसानिमित्त अनेक मंडळी खासकरुन युवा वर्ग "थर्टीफस्ट" साजरा करत असतात. पिणारे दणकून पितात तर खाणारे दणकून खातात.परंतु दारूच्या नशेत 31 डिसेंबर साजरा करताना वाद होण्याच्या,गुन्हे घडण्याच्या घटना देखील अनेक वेळेस पाहायला मिळाल्यामुळे श्रीरामपूर-नगरसह महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. 

        शासनाचे नियम तोडून जर कोणी 31 डिसेंबर साजरा करणार असेल, अवैधरीत्या दारू विक्री,अवैध मद्यपान व वाहन चालवणे, हॅाटेलात वादावादी करणे,छेडखानी करणे,गुन्हा करणे असे करणार असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे पोलीसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.