शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात मा.नगराध्यक्ष,नगरसेवक हिंदुत्ववादी पक्षाच्या वाटेवर जाण्याची शक्यता...
श्रीरामपुरात मा.नगराध्यक्ष,नगरसेवक हिंदुत्ववादी पक्षाच्या वाटेवर जाण्याची शक्यता...
श्रीरामपूर- राज्यामध्ये प्रलंबित असलेल्या पालिका निवडणुका लवकरच होणार असल्याने श्रीरामपुरात देखील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,श्रीरामपूर नगरपालिकेचे एक माजी नगराध्यक्ष हे त्यांच्या गटाच्या काही नगरसेवकांसह भारतीय जनता पार्टीत किंवा शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
श्रीरामपूरमध्ये तयार झालेले हिंदुत्ववादी वातावरण लक्षात घेता आणि विधानसभा निवडणुकीचा वाढलेला हिंदुत्ववादी मतदार टक्का डोळ्यासमोर ठेवून हे काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक भाजपात किंवा शिंदे सेनेत जावे या विचारात आहे. नगरपालिका निवडणुकांची घोषणा झाल्यावर मोठ्या प्रमाणात असे पक्षांतर होण्याची शक्यता आहे.