शिवप्रहार न्युज - ०१ कोटीची खंडणी मागितल्याचा रेल्वे पोलीस आढाव यांचा आरोप! 

शिवप्रहार न्युज - ०१ कोटीची खंडणी मागितल्याचा रेल्वे पोलीस आढाव यांचा आरोप! 

०१ कोटीची खंडणी मागितल्याचा रेल्वे पोलीस आढाव यांचा आरोप! 

श्रीरामपूर ( शिवप्रहार न्युज) मला ०१ कोटीची खंडणी मागत खोट्या गुन्ह्यात आडकविल्याचा आरोप रेल्वे पोलीस ज्ञानदेव अंबादास आढाव यांनी केला आहे. या संबंधी आढाव यांनी पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार केली असून एसपी अहिल्यानगर यांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की,मी बेलापूर रेल्वे स्थानकावर पोलीस म्हणून नोकरी करतांना एक महीला ४ -५ दिवसांपूर्वी भेटली व मला नोकरी लावून द्या म्हणाली मी तिला सांगीतले की,मला नोकरी लावता येत नाही.तेव्हा तिने माझा मोबाईल नंबर घेतला व त्यावर कॉल व मेसेज केले. दि.१८ मार्च रोजी तिने मला श्रीराम मंदीराजवळ बोलावले.

         श्रीराम मंदीराजवळ बाजुला एका खोलीत मला नेऊन ती म्हणाली मला ०१ कोटी रुपये द्या नाहीतर मी बलात्काराची केस करील.त्यावर मी तिला समजावून सांगून श्रीरामपूर बसस्टॅण्ड वर सोडले . संध्याकाळी मला एका व्यक्तीचा फोन आला व त्याने नेवासारोड वरील भारत गॅस जवळ बोलावले. तेथे एका इमारतीच्या खोलीत ती महिला व हि व्यक्ती हजर होते.ते म्हणाले तुझ्या विरुद्ध बलात्काराची केस होवू द्यायची नसेल तर थत्ते ग्राउंड येथे जा एक माणूस भेटेल. तुला वाचायचे असेल तर १ कोटी त्याला दे नाहीतर खोटी केस करून जेल मध्ये टाकू,बदनामी करू. त्यानंतर पैसे न दिल्याने शहर पोलीसात बलात्कार व अॅट्रोसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. 

      तरी सीसीटीव्ही फुटेज तपासून माझे वरील खोटा गुन्हा रद्द करून संबंधितांवर खंडणीचा गुन्हा दाखल करावा असे ज्ञानदेव आढाव यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे .