शिवप्रहार न्युज - एकलहरे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकावर हलगर्जीपणाचा आरोप करत तात्काळ बदली करा अन्यथा उपोषणाचा पदाधिकाऱ्यांचा इशारा…

शिवप्रहार न्युज -  एकलहरे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकावर हलगर्जीपणाचा आरोप करत तात्काळ बदली करा अन्यथा उपोषणाचा पदाधिकाऱ्यांचा इशारा…

एकलहरे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकावर हलगर्जीपणाचा आरोप करत तात्काळ बदली करा अन्यथा उपोषणाचा पदाधिकाऱ्यांचा इशारा…

टिळकनगर (वार्ताहर)-श्रीरामपुर तालुक्यातील एकलहरे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक समीर मणियार यांनी विविध विकास कामात हलगर्जीपणामुळे गावविकासात खीळ बसत असल्याने सदर ग्रामसेवकाची तत्काळ बदली करा अन्यथा पंचायत समितीत उपोषण करण्यात येईल याबाबत एकलहरे ग्रामपंचायत पदाधिकार्यासह ग्रामपंचायत सदस्य व तंटामुक्ती अध्यक्ष यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे. 

      या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामसेवक समीर मणियार यांची ३ वर्षांपासून एकलहरेत नेमणुक झालेली आहे.त्यांच्या कामकाजात सुरूवातीपासून हलगर्जीपणा असल्याने राज्य शासन व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या विविध योजना प्रत्यक्षात कामकाजाची कार्यवाही न करता तसेच योजनेची माहिती न देत असल्यामुळे त्याचा फायदा ग्रामस्थांना होत नाही. 

सन २०२२-२०२३ मध्ये दलित वस्तीचे प्रस्ताव सदर ग्रामसेवकाने संबंधीताकडे वेळेवर सादर न झाल्याने सुमारे ५५ लाख रूपयाची कामे जिल्हा परिषद अहमदनगर यांचेकडून मंजुर यादीत न आल्याने गावाचा विकासाला मोठा फटका बसत आहे.

      गावाचे घरकुलाचे प्रस्ताव आलेले होते पण ते योग्य रितीने राबविलेले गेले नसल्याने अद्यापही घरकुल गावाला मिळाले नाही.तसेच ग्रामस्थांना अपेक्षित प्रमाणे योग्य त्या शासकिय परिपत्रकावर (दाखले) यावर सह्या न करणे, नको ते नियम सांगणे, ग्रामपंचायत कार्यालयात उशिरा येणे, ग्रामस्थांच्या विविध कामांना अडथळा निर्माण करण्याचे काम सदर ग्रामसेवक करीत आहे. 

      यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष अन्सारशेठ शेख, पत्रकार लालमोहमद जहागीरदार, सरपंच पती अनिस शेख, उपसरपंच रमेश कोल्हे, रामदास झिने सह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.