शिवप्रहार न्युज - व्यापाऱ्याकडुन खंडणी मागणारे 2 आरोपी जेरबंद …
व्यापाऱ्याकडुन खंडणी मागणारे 2 आरोपी जेरबंद …
नगर-नमूद बातमीची हकिगत अशी की, दिनांक 14/12/2024 रोजी फिर्यादी श्री. किरण मोहनलाल राका, वय 56, धंदा व्यापार, रा.आदर्श कॉलनी, अहिल्यानगर हे सर्जेपुरा येथून घरी जात असताना यातील अज्ञात आरोपीतांनी मोटार सायकलवर येऊन, फिर्यादीस आडवून भाई का फोन आयेगा उठालो असे म्हणुन निघुन गेले.त्यानंतर फिर्यादीचे मोबाईलवर मेसेज पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. 1318/2024 बीएनएस कलम 126 (2), 351 (2) (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अहिल्यानगर शहरातील व्यापाऱ्यास दिलेल्या धमकी प्रकरणी प्राथमिक माहिती मिळताच मा. श्री.राकेश ओला, पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना नमूद गुन्हयांचा समांतर तपास करणेबाबत आदेशीत केले.
नमुद आदेशाप्रमाणे पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/ तुषार धाकराव व पोलीस अंमलदार संदीप पवार, संतोष खैरे, सागर ससाणे, रविंद्र घुंगासे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व महादेव भांड अशांचे पथक नेमुण गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले.
दिनांक 18/12/2024 रोजी तपास पथकाने घटनाठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे आरोपीतांचा अहिल्यानगर शहरामध्ये शोध घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नमूद गुन्हयातील संशयीत आरोपी हे रामवाडी रोड,तारकपूर येथे विना क्रमांकाचे ॲक्टीव्हा मोटार सायकलसह थांबलेले आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकाने रामवाडी रोडवर संशयीत विनाक्रमांकाचे ॲक्टीव्हा गाडीवरील इसमास शोध घेऊन ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी नाव 1) अजय अरूण साळवे, वय 42, रा.माधवबाग, आलमगीर, भिंगार 2) पवन प्रमोद उघडे, वय 24, रा.घर नं.79, सदरबाजार, भिंगार, अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.
पथकाने पंचासमक्ष आरोपीची अंगझडती घेऊन, आरोपीचे ताब्यातून 82,000/- रू किंमतीचा मुद्देमाल त्यात एक ग्रे कलरची ॲक्टीव्हा, नोकीया व जिओ कंपनीचे मोबाईल, विजय अरूण नवगिरे याचे आधारकार्ड पॅनकार्ड व बॅक पासबुक, एक रबरी स्टॅम्प, अनोळखी इसमाचे फोटो असा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
ताब्यातील आरोपी अजय अरूण साळवे यास विश्वासात घेऊन विचारपुस केली असता, त्याने खोटया कागदपत्रांचा वापर करून दिपक राजु भुजबळ, रा.घासगल्ली, कोठला, अहिल्यानगर याचे विजय अरूण नवगिरे, रा.कल्याण रोड, शिवाजीनगर या नावाने बनावट कागदपत्राच्या आधारे आधारकार्ड तयार केले. त्या बनावट आधारकार्डच्या आधारे वेगवेगळी कागदपत्रे तयार केली. आरोपी अजय साळवे याने व्यापारी किरण राका यांचेकडून खंडणी वसुल करण्याचे उद्देशाने दिनांक 22/11/2024 रोजी बनावट कागदपत्रावरून त्याने एअरटेल कंपनीचे 9422220667 या क्रमांकाचे नवीन सिमकार्ड घेतले. दिनांक 14/12/2024 रोजी रात्री 20.00 ते 21.00 वा.सुमारास आरोपी पवन प्रमादे उघडे याचेसह ॲक्टीव्ही मोटार सायकलवर जाऊन फिर्यादीस आडवून धमकावले व नंतर त्यांचेकडील नोकीया मोबाईलद्वारे फिर्यादी यांना खंडणी मागण्याकरीता धमकी दिल्याची माहिती सांगीतली.
ताब्यातील आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन हे करीत आहे.सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, मा. श्री. अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.