शिवप्रहार न्युज - “शिवप्रहार”च्या मावळ्यांमुळे छोट्या गोवंशाला जीवनदान…
“शिवप्रहार”च्या मावळ्यांमुळे छोट्या गोवंशाला जीवनदान…
श्रीरामपूर- शिवप्रहार प्रतिष्ठान संघटनेच्या मावळ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे श्रीरामपूर शहरामध्ये एका छोट्या गोवंशाला आज मंगळवारी दुपारी जीवनदान मिळाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, “शिवप्रहार”चे सदस्य मावळे श्री.यश नागरे व ललित अस्वले यांना बेलापूररोड परिसरात एका मोटरसायकलीवरुन ०२ जण छोट्या गोवंशाला कत्तलीसाठी घेऊन जाताना दिसले.यावेळी त्यांनी तात्काळ शिवप्रहारचे कार्याध्यक्ष श्री.चंद्रशेखर(चंदू)आगे यांना फोन केला असता त्यांनी लगेच श्रीरामपूर शहर पोलिसांशी संपर्क करत पोलिसांच्या मदतीने या गोवंशाची सुटका केली व दोन आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलिसांनी पुढील कारवाई केली आहे.
“शिवप्रहार” च्या सदस्य मावळ्यांच्या सतर्कतेमुळे या छोट्या गोवंशाला जीवनदान मिळाले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अनुसरुन एक कार्य झाले.यावेळी संतोष चव्हाण उर्फ पिंटू,राहुल अस्वले,गुरु आगे,यश नागरे,ललित अस्वले,अतुल मोरे,युवराज आगे,ओम सोनार,कार्तिक देवरे,आर्यन इ.उपस्थित होते.