शिवप्रहार न्युज - दारू पिऊन कारच्या काचा लावल्याने कारमध्येच मृत्यु...

शिवप्रहार न्युज -  दारू पिऊन कारच्या काचा लावल्याने कारमध्येच मृत्यु...

दारू पिऊन कारच्या काचा लावल्याने कारमध्येच मृत्यु...

 संगमनेर (शिवप्रहार न्युज)- अकोले तालुक्यातील हिवरगांव आंबरे गावचे परिसरातील शेतकरी विजय दौलत आंबरे ( वय ४५ ) हे त्यांच्या शेतातील पोल्ट्री फार्म जवळ दारुच्या नशेत त्याच्या कार मध्ये बसले व गाडीच्या काचा पुर्ण बंद केल्या.तेव्हा कारमध्ये दारुच्या नशेत असलेल्या विजय आंबरे यांना पुरेसा ऑक्सीजन मिळाला नाही त्यामुळे त्यांचा कारमध्येच मृत्यु झाला.

    २३ डिसेंबर सायंकाळी ६ ते २४ डिसेंबर दरम्यान हा दुर्देवी प्रकार घडला. आंबरे हे कारमधेच मृत अवस्थेत मिळून आले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले. याप्रकरणी अकोले पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पोनि.बोरसे यांच्या मार्गदशनाखाली पोना. घुले हे पुढील तपास करीत आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.