शिवप्रहार न्यूज - IRS समीरजी वानखेडे यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत- शिवप्रहार प्रतिष्ठान...

शिवप्रहार न्यूज - IRS समीरजी वानखेडे यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत- शिवप्रहार प्रतिष्ठान...

IRS समीरजी वानखेडे यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत- शिवप्रहार प्रतिष्ठान...

मुंबई- देशभक्त IRS अधिकारी समीरजी वानखेडे यांनी बॉलीवूड चित्रपट कलाकार शाहरुख खानचा पोरगा आर्यन खान याच्यावर अंमली पदार्थ संदर्भात केलेल्या कारवाईमुळे शाहरुख व कंपनीकडून समीर वानखेडे यांना टार्गेट केले जात आहे.भारत सरकारच्या CBI या संस्थेलाकाहीतरी चुकीची माहिती देऊन या अंमलीपदार्थ तस्करीवाल्या टोळीने समीर वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला.

      तरी समीर वानखेडे यांनी तात्काळ माननीय उच्च न्यायालयात धाव घेऊन याबाबत न्याय मागितला असता उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना अटक न करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहे.तसेच सीबीआयने अंमली पदार्थाच्या सेवनाविरोधात व त्या रॅकेट विरोधात आवाज उठवणाऱ्या एका सिंघम अधिकाऱ्या विरोधात छापेमारी केली.ज्यात समीर वानखेडे यांचे घर तसेच इतर संबंधित ठिकाणी छापेमारी झाली.परंतु सीबीआयला २३ हजार रोकड सोडून काहीही मिळाले नाही. परंतु सीबीआयच्या या कारवाई व छापेमारीमुळे नाहक एका देशभक्त अधिकाऱ्याला व त्यांच्या परिवाराला,लहान मुलींना त्रास सहन करावा लागत आहे. हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या सरकारने याकडे लक्ष द्यावे अन्यथा सरकार विरोधात जनमत तयार होईल.

      दरम्यान IRS समीरजी वानखेडे साहेब यांच्या मुंबई येथील निवासस्थानी शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख माजी पोलीस अधिकारी सुरजभाई आगे यांनी भेट दिली आणि अंमली पदार्थ विरोधातील त्यांच्या या लढाईस पूर्ण पाठिंबा दिला.कारण हिंदुस्थानचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी व्यसनावर प्रहार करुन निर्व्यसनीपणाचा पुरस्कार केला होता.

        तसेच मार्गदर्शक श्री.नितीनदादा चौगुले,अध्यक्ष शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान यांनी देखील समीरजी वानखेडे यांची नुकतीच भेट घेऊन या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले व IRS समीर वानखेडे यांना यापूर्वीच पाठिंबा दिला आहे.